गणपतीची आरती

गणपतीची आरती

॥ आरती ॥
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥ १ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनःकमना पुरती ॥

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥ २ ॥

हिरे जडित मुकुट शोभतो बाला ।
रवी शशांक करं तेथेच झळकला ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनःकमना पुरती ॥ ३ ॥

लंबोदर पितांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥

दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ॥ ४ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनःकमना पुरती ॥

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *